आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- अयाेध्येतील वादग्रस्त जागेच्या मालकीसाठी हिंदू व मुस्लिम समाजात न्यायालयीन वाद सुरू असताना अाता बाैद्ध समाजातील काही लाेकांनीही या जागेवर दावा केला अाहे. ‘अयोध्येतील रामजन्मभूमीतील श्रीराम मंदिराखाली बौद्धावशेष आहेत. श्रीरामाचा जन्म गंगेच्या पलीकडे झाला होता, तर त्यांचे महानिर्वाण शरयू नदीच्या तीरावर झाले होते’, असा दावा भदंत शुरेई ससाई व बौद्ध अभ्यासक भाऊ लोखंडे यांनी बुधवारी संयुक्त पत्रपरिषदेत केला. या वेळी आंबेडकरी कार्यकर्ते प्रा. रणजित मेश्राम उपस्थित होते.
‘मुळात शरयू नदीच्या काठी श्रीरामाची अयोध्या नव्हतीच. शरयू नदीकाठी असलेल्या साकेतला पुष्य मित्र शृंगाच्या काळात अयोध्या असे नाव देण्यात आले. रामाची मूळ अयोध्या गंगेच्या पलीकडे होती’, असा दावा भाऊ लोखंडे यांनी केला. तत्कालीन ख्यातनाम पुरातत्त्ववेत्ते बी. सी. लाल, काशी-बनारस विद्यापीठाचे संस्कृत पंडित डाॅ. जगन्नाथ उपाध्याय यांनी रामजन्मभूमीचे प्रामाणिक उत्खनन केल्यास हे स्थळ केवळ बौद्धांचेच सिद्ध होईल, असे कथन केले हाेते,’ असे लोखंडे यांनी सांगितले.
वादग्रस्त जागी होता पूर्वाराम बुद्धविहार
आज जेथे मंदिर-मशीद असल्याचे सांगितले जाते त्या जागेवर महादानी विशाखा यांनी पूर्वाराम प्रखंड बुद्धविहार उभारला होता. मात्र, ज्या प्राचीन बुद्ध विहाराच्या अवशेषांवर मंदिर व मशीद उभी राहिली, त्या बुद्ध विहाराचा साधा उल्लेखही कुणी करत नाही. या जागेचे खरे मालक बौद्धच असल्याचे भदंत शुरेई ससाई व भाऊ लोखंडे यांनी सांगितले. बाबर अयाेध्येला कधीच आला नाही. त्याचा सरदार मियाँ मीर बांकीने अयोध्येत मशीद बांधली. परंतु, रिवाजानुसार त्याने मशिदीला त्याचा स्वामी असलेल्या बाबराचे नाव दिले, असा भाऊ लोखंडेंचा दावा अाहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.