आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोल नाक्यावर चालकाने कर्मचार्‍याच्या अंगावर घातली कार, व्हिडिओ आला समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाण्यामधील एका टोल नाक्यावरील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. टोल नाक्यावर टोल न भरता चालकाने कार थेट कर्मचार्‍याच्या अंगावर घातल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. टोल नाक्यावर बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे. ही घटना 2 एप्रिलला घडली असून शनिवारी या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.


काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये..
- ही घटना ठाणे एलबीएस रोडवरील टोल नाक्यावरील आहे. आरोपी चालकाचे नाव विनोद खन्ना असे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
- सीसीटीवी फुटेज असे दिसते की, 2 एप्रिलला ठाण्यातील टोल नाक्यावर एक पांढर्‍या रंगाची कार येते. टोल कर्मचारी कार थांबवून त्याच्याकडून 35 रूपये टोल भरण्याची मागणी करतो. परंतु चालक टोल न भरताच त्याच्या अंगावर कार घालत तेथून पळ काढतो. या अपघातात टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.   
- या प्रकरणी ठाण्‍यातील श्रीनगर पोलिस स्टेशनमध्ये कार चालकाविरोधात वाहन नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...