आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • ACCIDENT: रत्नागिरीत टायर फुटून कार नदीत कोसळली, 12 वर्षीय मुलासह चौघे बेपत्ता Car Falls Into River On Mumbai Goa Highway Near Ratnagiri

ACCIDENT: टायर फुटून कार नदीत कोसळली, 7 तासांनंतर 3 मृतदेह व इनोव्हा गाडी सापडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार थेट नदी पात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. तब्बल सात तासांनंतर तीन मृतदेह आणि इनोव्हा गाडी सापडली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर (जि.रत्नागिरी) तालुक्यातील धामणी येथे आज (बुधवार) सकाळी हा अपघात झाला होता.

 

झाडाची फांदी हाती लागल्याने चालक थोडक्यात बचावला..
या अपघातात थोडक्यात बचावलेल्या चालकाने सांगितले की,  मुंबई- गोवा हायवेवरील खड्डयामुळे हा अपघात झाला आहे. कार खड्ड्यात आदळली आणि टायर फुटले. नंतर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून कारने पलटी घेत खोल दरीत कोसळली. नंतर कार नदी पात्रात पडून वाहून गेली. 12 वर्षीय मुलाला वाचवण्याचाही प्रयत्न केल्याचे चालकाने सांगितले. परंतु मुलाने सीट बेल्ट बांधला असल्याने त्याला वाचवता आले नाही. हाताला झाडाची फांदी लागली आणि नंतर स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी करून मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढल्याचे चालकाने सांगितले.

 

मिळालेली माहिती अशी की, कोकणातील लांजा येथे मुंबईतील पनवेल येथील फॅमिली बारशाच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून ते पनवेलकडे निघाले होते. धामणीजवळ कारचे टायर फुटले आणि कार नदी पात्रात कोळसली.

 

भरधाव कारचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आला आहे. बेपत्ता असल्याच्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...