आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • व्हायरल व्हिडिओ...पोलिस कॉन्स्टेबलने खुलेआम महिलेला छेडले, जमावाने दिला चोप Cop Molesting Women Video Went Viral

VIRAL VIDEO..आरपीएफ जवानाने खुलेआम काढली महिलेची छेड, जमावाने दिला बेदम चोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाहा व्हिडि्ओ... - Divya Marathi
पाहा व्हिडि्ओ...

मुंबई- कुंपनच शेत खात असल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण रेल्वे स्टेशनवर घडला आहे. सोशल मीडियावर एका रेल्वे सुरक्षा बलाच्या एका जवानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शेजारी बसलेल्या महिलेची खुलेआम छेड काढताना हा जवान व्हिडिओत दिस‍त आहे. पीडित महिला आरडाओरड करताच जमाव आरोपीला बेदम चोप देतात. ही घटना मोबाइल कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

 

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

- व्हायरल व्हिडिओ कल्याण रेल्वे स्टेशनवरील आहे. प्लॅटफॉर्मवरील एका बाकावर दोन महिला आणि जवान बसलेला दिसत आहे. आरोपी शेजारी बसलेल्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो. ही बाब महिलेच्या लक्षात येताच ती आरडाओरड करते, नंतर प्लॅटफार्मवर उपस्थित लोक आरोपीला बेदम चोप देतात. परंतु आरोपी पळून जाण्यात यशस्वी होतो.

 

आरोपीचा शोध सुरु...
या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही.  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...