आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • MUMBAI: मरिन ड्राईव्ह परिसरात भररस्त्यावर अश्लील चाळे, जोडप्याचा व्हिडिओ व्हायरलcouple Making Out On Road Divider In Marine Drive

MUMBAI: मरिन ड्राईव्ह परिसरात भररस्त्यावर \'खुल्लम खुल्ला\' अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मरिन ड्राईव्ह परिसरात भररस्त्यावर खुल्लम खुल्ला अश्लील चाळे करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परदेशी नागरिकासोबत अश्लील चाळे करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची महिला सुधारगृहात रवानगी करण्‍यात आली आहे.

 

पावसाळा सुरु झाला की मरिन ड्राईव्हवरील कट्ट्यावर प्रेमीयुगुल दिसणारच, हे समिकरण झाले आहे. परंतु  काल (गुरुवार) एका जोडप्याने कहरच केला. एक महिला एका परदेशी नागरिकासोबत क्वीन्स नेकलेस रोडवर दिवसाढवळ्या दुभाजकावर अश्लिल चाळे करत होती. जोडप्याला रस्त्यावरून जाणारे- येणारे लोक आपल्या मोबाइल कॅमेर्‍यात कैद करत होते.

आता हेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

पोलिस येताच महिलेची उडाली भंबेरी...

या घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेले पोलिस क्वीन्स नेकलेस रोडवर पोहोचले. पोलिसांना पाहाताच महिलेची चांगलीच भंबेरी उडाली. स्वत:ला सावरत ती तिथून काढता पाय घेत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सुरुवातील तिने गोव्याची असल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु, ती नंतर काहीही बरळू लागल्याने पोलिसांनी तिची रवानगी चेंबूर येथील महिला सुधारगृहात केली अाहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...भररस्त्यावर 'खुल्लम खुल्ला' अश्लील चाळे करणार्‍या जोडप्याचे सोशल मीडियावर शेअर झालेले फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...