आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदने परतण्याची तयारी दर्शवली; सरकारला अटी अमान्य, राज ठाकरेंनीही केला होता गौप्यस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे-1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याने भारतात परतण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवावे, अशी अट त्याने सरकारसमोर ठेवली होती, परंतु सरकारने त्याचा प्रस्ताव फेटाळल्याचा दावा ठाण्यातील एका क्रिमिनल लॉयरने केला आहे.

 

दाऊद याने भारतात परत येण्याची इच्छा दर्शवली आहे. मात्र, सरकारने दाऊदचा प्रस्ताव अमान्य केला आणि अजूनही दाऊदला अटक झाली नाही, अशी माहिती ठाणे कोर्टात देण्यात आली. अॅडव्होकेट श्याम केसवानी यांनी हा दावा केला असून बेकायदा वसुली केल्याप्रकरणी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची वकीली करत आहे. अॅड. केसवानी यांनी याबाबत पत्रकारांन माहिती दिली.

 

आर्थर रोड तुरुंगात हाय सिक्युरिटीमध्ये राहू इच्छीतो दाऊद
- न्यूज एजन्सीनुसार, अॅड. केसवानी यांनी सांगितले की, दाऊद याने भारतात परतण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात हाय सिक्युरिटीमध्ये ठेवावे, अशी अट त्याने सरकारसमोर ठेवली होती. मात्र, सरकारने त्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. 

- दाऊदची भारतात परण्याची इच्छा प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनीही काही वर्षांपूर्वी वर्तवली होती. परंतु दाऊदच्या अटी सरकारला अमान्य आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. राज ठाकरेंनी यापूर्वी केला होता दाऊदबाबत हा गौप्यस्फोट...

 

बातम्या आणखी आहेत...