आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा प्रश्न : अाैरंगाबाद मनपा बरखास्त करावी; विधिमंडळात धनंजय मुंडे यांची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- औरंगाबादेतील अभूतपूर्व कचराकोंडीचा प्रश्न पुन्हा पुन्हा राज्याच्या विधिमंडळात गाजला. या प्रश्नावरून विरोधकांना पुुन्हा सरकार व मनपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत स्थगन प्रस्तावात म्हणाले की, औरंगाबादेत गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेची सत्ता हाती असलेल्या शिवसेनेमुळेच कचऱ्याचा प्रश्न चिघळला अाहे. कचऱ्याच्या प्रश्नावरून गाेळीबार, दगडफेकीसारखे प्रकार घडणे हे सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणे अाहे. त्यामुळे ही महानगरपालिका बरखास्त करून तेथे प्रशासक नेमावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

 

मनपाला तीन वेळा नोटीस :पर्यावरणमंत्री रामदास कदम
पर्यावरण मंत्री रामदास कदम विधान परिषदेत म्हणाले, राज्याचे पर्यावरण खाते झाेपलेले नसून कचरा विल्हेवाटीसंदर्भात अाैरंगाबाद मनपाला तीन वेळा नाेटीस दिलेली होती.नारेगावच्या ग्रामस्थांनी कचऱ्यास विराेध केल्याने खंडपीठानेही मनाई केली आहे. त्याविरुद्ध सरकार आणि मनपा सुप्रीम कोर्टात जाणार आहे.  अाैरंगाबादेतील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रसामग्री सरकारी नियमाप्रमाणे निविदा न काढता तत्काळ खरेदी होईल. प्रकल्पासाठी जमीनही दिली जाईल. त्यासाठी लागणारा पैसा राज्य सरकार देणार आहे.

 

ठेकेदारांशी हितसंबंध : झांबड
काँग्रेसचे सुभाष झांबड म्हणाले, कचऱ्यासंदर्भात १९९७ मध्ये युनिट सुरू केले हाेते. मात्र, ते जाणूनबुजून बंद केले अाहे. कारण कचरा उचलण्याच्या ठेकेदारांचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी हितसंबंध असल्याचा अाराेपही त्यांनी केला.

 

‘अर्थ’पूर्ण संबंध : सतीश चव्हाण 
राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण म्हणाले की,  शहरात ६ हजार मेट्रिक टन कचरा रस्त्यावर व गल्लीबाेळात तुंबल्यामुळे अाराेग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला अाहे. कचरा उचलण्याचे काम दिलेले बचत गट हे नगरसेवकांशी संबंधित असल्याचा अाराेप त्यांनी केला.

 

हेही वाचा,
- मिटमिट्यात कडकडीत बंद, देवळाईकरही इरेला पेटले!

- दिव्‍य मराठी भाष्‍य: ‘बळा’च्या वापराला समर्थन नाही म्हणजे, दगडफेकीलाही नाही    

बातम्या आणखी आहेत...