आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेत गदारोळ..गंगाखेडचे रत्नाकर गुट‌्टे महाराष्ट्राचा छाेटा नीरव माेदी; धनंजय मुंडेंचे गंभीर अाराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे हे महाराष‌्ट्रातील छाेटा नीरव माेदी अाहेत, असा घणाघाती अाराेप विराेधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचा केला अाहे. रत्नाकर गुट्टे यांनी तब्बल 600 शेतक-यांच्या नावे 5500 काेटी रुपयांची कर्जे उचलली अाहेत. धक्कादायक माहिती अशी की, गुट‌्टे रिझर्व्ह बॅंक अाॅफ इंडियाची काेणतीही परवानगी न घेता मयत शेतक-यांच्या नावे काेट्यवधींची कर्जे उचलली अाहेत. डीएसकेंवर कारवार्इ हाेते मग गुट्टेंवर का नाही, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला अाहे. 

 

 

दरम्यान, 3 मे रोजी शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटपाचे आंदोलन केले हाेते, त्यावेळी सरकारला कळले नाही का, हे शेतकरी उद्या आंदोलन करु शकतात, असा सवाल विराेधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला. सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे ढुंकूनही बघत नसल्याचा अाराेप करत धुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय दूध भुकटीचे अनुदान पुढचे सहा महिने लागू ठेवावे, अशी मागणी केली. दुसरीकडे, परराज्यातून आलेल्या दूधवर कर लावण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली अाहे.

 

दरम्यान, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दूध कोंडीवर आज (मंगळवार) विधानपरिषदेत चर्चा झाली. यावेळी सत्ताधारी अामदार अाणि विराेधकांमध्ये चांगलीच खंडाजंगी झाली.

 

दोन दिवसात चर्चा करून तोडगा काढू- महादेव जानकर

विधिमंडळ सदस्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दुग्धविकास राज्य मंत्री आश्वासन महादेव जानकर यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसात चर्चा करून तोडगा काढण्यात येर्इल. 

बातम्या आणखी आहेत...