आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणार प्रकल्प समर्थकांची पत्रपरिषद नारायण राणेंच्या समर्थकांनी उधळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नाणार प्रकल्पाशी काेणताही संबंध नसलेल्या अजयसिंह सेंगर यांनी या प्रकल्पाच्या समर्थनार्थ बुधवारी बाेलावलेली पत्रकार परिषद नाणार प्रकल्प संघर्ष समिती अाणि नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. नाणार प्रकल्प वाचवण्यासाठी सेंगर यांनी समिती स्थापन केली अाहे.

 

मात्र, या प्रकल्पाशी सेंगर यांचा काेणताही संबंध नसल्याचा अाराेप करत अांदाेलनकर्त्यांनी घाेषणाबाजी करत या परिषदेला विराेध केला. काेकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विराेध केला अाहे. 

 

शिवसेना अाणि मनसेने या पक्षांनीदेखील या विराेधाच्या लढार्इत उडी घेतली अाहे. असे असताना या प्रकल्पाच्या समर्थनार्थ नाणार बचाव समितीचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी  बुधवारी पत्रकार परिषद अायाेजित केली हाेती. या परिषदेची कुणकुण नाणार प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती अाणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना लागली. विराेधाचे वातावरण तापलेले असताना  या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या सेंगर यांच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी करत पत्रकार परिषद उधळून लावली.  या वेळी एकच गोंधळ उडाला.

 

सरकारने पाठवलेले हे दलाल : वालम 
संघर्ष समिती गेल्या दहा महिन्यांपासून शांततेने अांदाेलन करत अाहेत. मात्र, सरकारने पाठवलेले हे दलाल अांदाेलन भडकवण्याचे काम करत अाहेत. अजय सेंगर हे करणी सेनेचे अध्यक्ष असून पद्मावती चित्रपटाच्या विराेधात अशाच प्रकारे अांदाेलन करून ते प्रकाश झाेतात अाले हाेते. सेंगर यांचा रिफायनरीशी संबंध काय ते प्रकल्पग्रस्त अाहेत का, अशी विचारणा नाणार प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अशाेक वालम यांनी या वेळी केली.

 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...