आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एसटी\'ला डिझेलवर करमाफी द्या, दिवाकर रावते यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंधनाच्या वाढत्या दरांचा तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा होऊ घातलेला वेतन करारही अडचणीत आला आहे. महामंडळाला या अडचणीतून सोडवण्यासाठी महामंडळाच्या बसला पुरवण्यात येणाऱ्या डिझेलवरील विविध कर माफ करावेत, अशी विनंती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  


रावते यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात सोमवारी सविस्तर पत्र दिले. त्या पत्रात म्हटले आहे, ‘सध्या दिवसेंदिवस होत असलेल्या भरमसाट इंधन दरवाढीचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या आर्थिक व्यवहारावर होत आहे. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर वार्षिक अंदाजे ४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्याचा परिणाम म्हणून महामंडळाचा कर्मचाऱ्यांसमवेत होऊ घातलेला वेतन करारही अडचणीत सापडला आहे. डिझेलवरील राज्य सरकारची करमाफी करण्यात यावी.’ परिवहन मंत्रालय शिवसेनेकडे आहे. शिवसेना आणि भाजपत मोठा तणाव आहे. ही मागणी राज्य सरकारला मान्य करणे अडचणीचे ठरणार आहे. ही मागणी मान्य होणार नाही, हे रावते यांनाही माहिती आहे. हे माहीत असतानाही रावते यांनी करमाफीची मागणी रावते यांनी या वेळी केली.

 

मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न  
रावते यांच्या मागणीने मुख्यमंत्री फडणवीस अडचणीत आल्याचे सांगितले जात आहे. ऐन दिवाळीत एसटी कामगारांनी संप केला होता. त्या वेळी केलेला वेतन करार अद्याप पूर्णत्वास जाऊ शकलेला नाही. त्यात आता इंधन दरवाढीने एसटी महामंडळाचे कंबरडे मोडले आहे. इंधर दरांचा निर्णय केंद्राचा असतो. केंद्रात भाजपचे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यामुळे सेनेने डिझेलवरील करमाफीची मागणी पुढे करत, दरवाढीचे परिणाम अप्रत्यक्षपणे जनतेसमोर ठेवले.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, इंधन दरवाढीविराेधात मालवाहतूकदारांचा लाक्षणिक संप...

बातम्या आणखी आहेत...