आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांनो लक्ष द्या..पुढील स्टेशन 'प्रभादेवी'; आज मध्यरात्री एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनचे नामकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनचे नामकरण आज (बुधवार) मध्यरात्रीपासून प्रभादेवी करण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनच नाव प्रभादेवी करण्याची मागणी सर्वात प्रथम शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी लोकसभेत केली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडे  सातत्याने पाठपुरावा करून 'प्रभादेवी' नावास अंतिम स्वरूप दिले.

 

आज रात्री 11 वाजता प्रभादेवी मंदिरात देवीची पूजा करण्यात येणार आहे. शोभा यात्रा मंदिरापासून एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनला 11:45 मिनिटांनी पोहचेल. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता 'प्रभादेवी रेल्वे स्थानक' असा नामकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...