आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • मुलीच्या विरहात दाम्पत्याने संपूर्ण कुटुंब संपवले, दुर्गंधी पसरल्याने उघड झाली घटना Family Murdered In Cuff Pared Mumbai

मुलीच्या विरहात दाम्पत्याने संपूर्ण कुटुंब संपवले, दुर्गंधी पसरल्याने समोर आली घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काही महिन्यांपूर्वी मरण पावलेल्या मुलीच्या विरहात दाम्पत्याने मुलासह स्वत:चे आयुष्यही संपवल्याची घटना दक्षिण मुंबईच्या कफ परेड भागात उघडकीस आली आहे. प्रवीण पटेल (वय-41), पत्नी रिना पटेल (वय-35) आणि मुलगा प्रभू (वय-11) अशी मृतांची नावे आहेत.

 

मागील दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते आणि आतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार दार तोडून बघितले असता आत तिघांचेही मृतदेह सापडले. शेजाऱ्यांच्या मते, काही दिवसांपूर्वी पटेल यांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबीयच विरहात होते. त्यांनी इतरांशी बोलणेही बंद केले होते. दरम्यान, याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

 

बातम्या आणखी आहेत...