आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रीचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून सिव्हिल इंजिनिअरने केली फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कर्नाटकमधील एका सिव्हिल इंजिनिअरने बॉलीवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार हिच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनवून आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्रज्ज्वल गोपाळकृष्ण (वय-25) या पोलिसांनी अटक केली आहे.

 

आईला जडलेल्या कर्करोगावरील (कॅन्सर) उपचारासाठी पैसे नसल्याने आपण हे कृत्य केल्याचे प्रज्ज्वल याने पोलिसांना माहिती दिली. कोर्टाने आरोपीला 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

काय आहे हे प्रकरण?
प्रज्ज्वल याने दिव्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून गुजरातमधील एका शिक्षकाची 41 लाखांना फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

 

प्रज्ज्वल म्हणाला..वृत्तपत्रात बातमी वाचल्याने सुचली कल्पना
मूळचा कर्नाटकचा असलेला प्रज्ज्वल आपल्या कुटुंबियांसोबत बंगळुरुला राहात होता. तो दिव्याचा मोठा चाहता आहे. काही दिवसांपूर्वी प्रज्ज्वलने वृत्तपत्रात अशा प्रकारच एक वृत्त वाजले होते. एकाने अभिनेत्याच्या नावाने बनावट फेसबूक अकाउंट उघडून आर्थिक फसवणूक केली होती. या वृत्ताने प्रभावित होऊन प्रज्ज्वलने दिव्याच्या नावाने बनावट फेसबूक अकाउंट बनवले. नंतर गुजरातमधील बडोद्यातील प्रतापनगरमध्ये राहाणार्‍या शिक्षकाला दिव्याच्या बनावट अकाउंटवरून मेसेज पाठवले. विशेष म्हणजे हा शिक्षक देखील दिव्याचा चाहता निघला. प्रज्ज्वल शिक्षकासोबत दिव्या म्हणून संभाषण करत होता.

 

शिक्षकाने एक डॉक्युमेंट्री शेअर केली. टीसीरिज कंपनीच्या मालकाच्या शिफारशीनुसार नवीन चित्रपटात काम करण्याची प्रज्ज्वल याने दिव्या शिक्षकाला ऑफरही दिली. तसेच त्याने शिक्षकाला चित्रपटात एक कोटींची गुंतवणूक करावी लागेल, असेही सांगितले होते. शिक्षकाने कर्ज काढून 41 लाख रूपये जमवले.

 

प्रज्ज्वल याने शिक्षकाला पैसे घेऊन मुंबईतील ओशिवरा परिसरात बोलवले. परंतु, दोन चित्रपटाचे शूटिंग असल्याने मी येऊ शकत नाही, माझा सेक्रेटरी कार घेऊन येईल त्याच्याकडे पैसे द्या, असे दिव्याच्या नावाने प्रज्ज्वने मेसेज करून सांगितले. ठरल्याप्रमाणे शिक्षक पैसे घेऊन ओशिवरा परिसरात पैसे घेऊन आला. प्रज्ज्वलही आलिशान गाडीत पोहोचला. प्रज्ज्वलने दिव्याचा सेक्रटरी असल्याचे सांगत शिक्षकाकडून पैसे घेतले आणि तेथून पळ काढला.

 

दोन दिवसांनी फसवणूक झालेल्या शिक्षकाने फोन केला असता, फोन लागत नव्हता. चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे शिक्षकाच्या लक्षात आले. शिक्षकाने थेट ओशिवरा पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. हे प्रकरण गांभिर्याने घेत गुन्हा दाखल केला. तपासाची चक्रे फिरवत आरोपी प्रज्ज्वल गोपालकृष्ण याला बंगळुरुमधून अटक केली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक पाहा...दिव्या खोसला कुमारचे निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...