आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्याचा पाचवा बळी..खड्ड्यात बाईक आदळली अन् मागून आलेल्या ट्रकने तरुणाला चिरडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- खड्ड्यात दुचाकी आदळल्यानंतर मागून आलेल्या भरधाव ट्रकखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कल्याणमध्ये झाली आहे. कल्पेश जाधव असे या तरुणाचे नाव आहे. गांधारी पुलाजवळ गुरुवारी रात्री ही घटना घडली. कल्याणमध्ये गेल्या महिन्याभरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

 

कल्पेश कल्याणजवळील एका गावात राहात होता. तो बाईकवरुन चालला होता. गांधारी पूलाजवळ त्यांची बाईक खड्ड्‍यात गेली. तो रस्त्यावर पडला. मागून आलेल्या भरधाव ट्रकने चिरडल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

 

दरम्यान, पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे पाच जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या आठवड्यात खड्डा चुकवताना बाईक घसरुन ट्रकखाली आल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...