आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MUMBAI FIRE: विरार रेल्वे स्टेशनवर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग, मोठा अनर्थ टळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विरार रेल्वे स्टेशनवर प्लॅटफार्म क्रमांक 4 वर अचानक भीषण आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्लॅटफॉर्मवर लोकल गाडी उभी होती. आग भडकताच प्लॅटफार्मवर प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानीचे वृत्त नाही.

 

मिळालेली माहिती अशी की, प्लॅटफार्मवरील इलेक्ट्रिक बॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली होती. या घटनेमुळे लोकल सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

 

पाहा...विरार रेल्वे स्टेशनवर शॉर्टसर्किटमुळे भीषण आगीचा Video

बातम्या आणखी आहेत...