आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: भांडूप येथील सह्याद्री विद्यामंदिरात 16 विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेला खिचडीतून विषबाधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भांडूप येथील सह्याद्री विद्यामंदिर शाळेतील 16 विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेलाही विषबाधा झाली आहे. सगळ्यांना मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर त्यांना मळमळ होऊन उलट्या झाल्या. गुरुवारी दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एका शिक्षिकेचाही समावेश आहे. सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सां‍गितले.

 

मिळालेली माहिती अशी की, सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांना जेवणात खिचडी देण्यात आली होती. जेवणानंतर अर्ध्या तासाने विद्यार्थ्यांना पोटात दुखणे, मळमळ होणे, उलट्या होणे असा त्रास सुरु झाला.


दरम्यान, गेल्या आठवड्यात मुंबईतील गोवंडी भागातील महापालिकेच्या संजयनगर उर्दु जवळपास 70 विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधातून विषबाधा झाली होती. या घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.

 

बातम्या आणखी आहेत...