आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबईत भरदिवसा रेल्वे स्टेशनवर तरुणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नवी मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर भरदिवसा एका तरुणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग करण्‍यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवरून मुंबईत महिलांच्या सुर‍क्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

सूत्रांनुसार, गुरुवारी सकाळी तुर्भे रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली. एका भामट्याने एका तरुणीचा विनयभंग करत तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

 

पीडित तरुणी घणसोलीला जाण्यासाठी सकाळी साडे अकराला रेल्‍वे स्टेशनवर लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती. तितक्यात एक व्यक्‍ती तिच्या मागून आला आणि जबरदस्‍तीने तिचे चुंबन घेण्‍याचा प्रयत्‍न केला. पीडितेने त्याचा प्रतिकार करत त्‍याला दूर धकलले. तो पळून जाण्याच्या बेतात असताना रेल्वे सुरक्षा जवानांनी त्याला पकडले. नरेश जोशी (वय-43) असे या आरोपीचे नाव आहे. पीडितने दिलेल्या तक्रारीवरून रेल्‍वे पोलिसांत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... घटनेचा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...