आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

High Tide: मुंबईत बुधवारी जोरदार पावसाची शक्यता; सिंहगड, प्रगतीसह अनेक एक्सप्रेस रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईसह उपनगरात आज (मंगळवार) पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. डोंबिवली, ठाणे, सायन, दादर परिसरात संततधार सुरू आहे. सकल भागात पाणी साचले आहे. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

 

हवामान विभागाने मुंबईत बुधवार, गुरुवार दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याहून बुधवारी सुटणारी सिंहगड आणि प्रगतीसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्‍यात आल्या आहेत.

 

पावसामुळे रद्द करण्यात आलेल्या गाड्या...
- मनमाड- मुंबई- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस (22102/22101)
- मनमाड- लोकमान्य टिळक टर्मिनस- मनमाड(12118/12117)
- पुणे- मुंबई- पुणे सिंहगड एक्स्प्रेस (11010/11009)
- पुणे- मुंबई- पुणे प्रगती एक्स्प्रेस(12126/12115)

 

जून महिन्याच्या नोंदीनुसार मुंबईत 795.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यायला विसरू नका, असा इशारा मुंबईकरांना देण्यात आला आहे.

 

बहुतांश भागात रस्त्यावर तुंबले पाणी...

परिसर कुठे-किती साचले पाणी
हिंदमाता 1 फूट
ओबेरॉय मॉलजवळ 2 फूट
सीएसटी रोड 2 फूट
कुर्ला 2 फूट
माहिम जंक्शन जवळपास 1 फूट
नेहरू नगर ब्रिज 1ते 1.5 फूट

 

दरम्यान, उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील बहुतांश नदी-नाल्यांना पूर आला आहे. पिथौरागडमध्ये एक नागरिक नाल्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे. काली आणि गोरी नदीच्या जलपातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मसूरी आणि चमौली जिल्ह्यात ढगफुटीमुळे भूस्खलन झाल्याचे वृत्त आहे. बहुतांश भागातील रस्ते बंद आहेत. हवामान विभागाने देहरादूनसह आठ जिल्ह्यात पुढील 24 तासांत मुसधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...