आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- भारतीय क्रिकेट संघाला परदेशात पहिला कसोटी मालिका विजय मिळवून देणारे माजी कर्णधार अजित वाडेकर (७७) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी रेखा, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. वाडेकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९७१ मध्ये इंग्लंडमध्ये भारताने परदेशातील पहिला कसोटी मालिका विजय मिळवला होता.
वनडेचे पहिले कर्णधार
अजित वाडेकर हे भारतीय वनडे क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार होते. १९७४ मध्ये निवृत्त झालेले वाडेकर ९० च्या दशकात अझरुद्दीन कर्णधार असताना भारतीय संघाचे व्यवस्थापक होते.
- ३७ कसोटी सामने, २,११३ धावा , ०१ शतक
नेतृत्वात इंग्लंड, विंडीजची जिरवली
अापल्या कुशल नेतृत्वात अजित वाडेकर यांनी बलाढ्य यजमान इंग्लंड संघाची जिरवली अाणि इंग्लंडच्या मैदानावर भारतीय संघाला पहिला एेतिहासिक कसाेटी मालिका विजय मिळवून दिला. त्यांच्या नेतृत्वात भारताने क्रिकेटमधील निष्णात इंग्लंडची जिरवली. १९७१ मध्ये कसाेटी मालिका विजयाचा श्रीगणेशा केला. त्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वात भारताने विंडीजलाही धूळ चारण्याचा पराक्रम गाजवला. भारताला अशा प्रकारे दाेन मालिका विजयाचे एेतिहासिक यश संपादन करून देणाऱ्या माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्यावर अाज शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. बीसीसीअायसह पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
पद्मश्री, अर्जुन पुरस्काराने गाैरव
भारतीय क्रिकेटला एका उंचीवर नेण्यासाठी वाडेकर यांचे माेलाचे याेगदान ठरले. यामुळे त्यांना १९६७ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले. त्यानंतर क्रिकेट क्षेत्रातील भरीव योगदानासाठी १९७२ ला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात अाले हाेते.
१९९६ मध्ये पदार्पण; १६ कसाेट्यांचे नेतृत्व
माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी १३ डिसेंबर १९६६ मध्ये अांतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली. त्यांनी यादरम्यान विंडीजविरुद्ध सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी ३७ कसोटीत भारताचे प्रतिनिधीत्व केले. यात एका शतक अाणि १४ अर्धशतकांच्या अाधारे त्यांनी २,११३ धावांची अापल्या नावे नाेंद केली. त्यांनी १६ कसाेटीत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यातील चार कसाेटीत भारतासाठी विजयश्री खेचून अाणली. दाेन वनडेत त्यांच्या ७३ धावा आहेत. त्यांनी १९७४ मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
पुढील स्लाइडवर पाहा, टीम इंडियाने वाहिली श्रद्धाजंली...
- भारतीय क्रिकेटचा ‘लकी मॅन’ गेला!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.