आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai: पनवेलजवळ रस्ता समजून घाेटी नदीत काेसळली कार, गावकर‌्यांमुळे वाचला शेख कुटुंबाचा जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबर्इ- पनवेलमधील तळाेजजवळ रस्ता समजून भरधाव कार घाेटी नदी पात्रात घुसली. कारमध्ये 4 जण हाेते. सुदैवाने गावकरी वेळीच मदतीला धावून आल्याने चाैघांचे प्राण वाचलेॅ.

 

मिळालेली माहिती अशी की, तळोजा येथील राहणारे अश्रफ शेख हे अापल्या कुटुंबियांसाेबत बाहेर जात हाेते. घोटी नदीच्या पुलाला संरक्षक कठडा नसल्याने अश्रफ यांना त्याचा अंदाज आला नाही. त्यांची कार थेट नदी पात्रा काेसळली. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत पहिल्यांदा सगळ्यांना कारच्या टपावर येऊन बसायला सांगितले. नंतर दोरीच्या साहाय्याने एकेकाला पाण्याबाहेर काढले.  नंतर कारही बाहेर काढण्यात अाली. 

 

दरम्यान, मुंबर्इ, पुणे, काेकणासह काेल्हापूरात अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली अाहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर  अाला अाहे. धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली अाहे. 

 

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा

मुंबर्इ, पुणे, काेकणासह काेल्हापूरात मुसळधार पाऊस सुरु असला तरी राज्याचा मोठा भाग अजूनही कोरडाठाक आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे. नंदुरबार आणि शिंदखेडा तालुक्यात तर पाऊसच पडला नाही. धुळे जिल्ह्यात सरासरी 200  मिलिमीटरही पावसाची नोंद झालेली नाही. नंदुरबार जिल्ह्याची स्थितीही सारखीच आहे. 

नंदुरबार तालुक्यात तर गेल्या दीड महिन्यात 100 मिलीमीटर तर शिंदखेडा टाळूंख्यात 86 मिलीमीटर पाऊस पडला. अत्यल्प पावसामुळे या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत. तापी नदी सोडल्याने एकाही नदी नाल्याला पूर आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...