आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवावरून शिवसेना-मनसे आमने-सामने, उद्धव यांना आव्हान देण्यासाठी राज ठाकरे मैदानात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई महापालिकेने गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मंडळांना परवानगी नाकारल्याने शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा, असे सूचना त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना दिल्या आहे.

 

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांआधी गिरगावच्या खेतवाडीत जाऊन गणेश मंडळ अध्यक्षांची भेट घेतली होती. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. मंडपांसाठी मुंबई मनपा परवानगी देत नसल्याची गणेश मंडळांची तक्रार होती.

 

मनसेने शिवसेना भवनासमोर लावले मोठे पोस्टर..

गणपती मंडप बांधण्याच्या कठोर नियमांविरोधात मनसेने शिवसेना भवनासमोर मोठे पोस्टर लावले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून मनसेने सत्ताधारी भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेवर कडाडून हल्ला केला आहे . 'अयोध्याचे मंदिर नक्की बांधा पण त्याच्याआधी मुंबईत गणपती मंडप बांधण्यासाठी परवाणगी द्या.',  असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.

 

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी 'मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे आणि अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. 'चलो अयोध्या.. चलो वारणसी' चे आवाहन करणारे होर्डिंग त्यांनी मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरात लावले होते. यावर राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...