आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला, लग्नासाठी मागितलेली होती 45 दिवसांची रजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा पॅरोल नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी फेटाळला आहे. लग्नासाठी त्याने 45 दिवसांची रजा मागितली होती. सालेम याने 16 फेब्रुवारीला मुंबईतील तळोजा जेलमध्ये अर्ज केला होता. परंतु त्याचा अर्ज नामंजूर करण्‍यात आला आहे.

 

स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार सयैद बहार कौसर उर्फ हिना हिच्याशी निकाह करण्यासाठी पॅरोल मिळावा, असे सालेम याने आपल्या अर्जात म्हटले होते.

 

दरम्यान, सालेम हा 12 वर्षे, 3 महिने आणि 14 दिवसांपासून तुरुंगात आहे. या काळात त्याने एकही ‍‍दिवस सुटी घेतली नाही. तुरुंगातील सालेमची वर्तवणूक पाहाता त्याचा अर्ज 27 मार्च रोजी कोकण विभागीय आयुक्ताकडे पाठवण्यात आला होता. अहवाल तपासल्यानंतर सालेमचा अर्ज 5 एप्रिलला ठाण्याच्या पो‍लिस आयुक्तांकडे सादर करण्‍यात आला होता. पुढील चौकशीसाठी अर्ज मुंबईतील मुंब्रा पो‍लिस स्टेशनला पाठवण्यात आला होता.

 

ठाण्याचे पोलिस आयुक्त परंभीर सिंह यांनी दिलेली माहिती अशी की, सालेम याने लग्नासाठी 45 दिवसांची रजा मागितली होती. 5 मे रोजी त्याचे लग्न आहे.परंतु त्याचा हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. पॅरोलच्या काळात सालेम हा हिनाच्या घरी राहाणार होता. पॅरोलसाठी सालेम याने दोन जामीनदारही सादर केले होते. मोहम्मद सलेम अबुल रजक मेमन आणि मोहम्मद राफिक सयैद अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय हिना, तिची आई आणि राफिक सयैद यांचे मुंब्रा  पोलिस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यात आले होते.

 

काय आहे प्रकरण?
मुंब्राच्या हिना कौसरने २०१५ मध्ये टाडा कोर्टात सालेमशी लग्नाची इच्छा व्यक्त करत परवानगी अर्ज केला. २०१४ मध्ये यूपीत एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी जाताना सालेमने तिच्याशी धावत्या रेल्वेत लग्न केल्याची चर्चा होती. त्याचा सालेमने इन्कार केला. हिना भेटण्यास आली होती. मात्र, माध्यमांच्या लग्नाच्या वृत्तामुळे तिची बदनामी झाली. त्यामुळे आता तिच्याशी विवाह करावाच लागेल, असे सालेमने अर्जात म्हटले होते.

 

सालेमची पहिली पत्नी अमेरिकेत..

सालेम याने 1991 मध्ये मुंबईत राहाणारी समायरा जुमानी हिचासोबत पहिला निकाह केला होता. समायरा आपल्या दोन मुलांसह अमेरिकेत स्थायिक झाली आहे. नंतर सालेम याने बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी हिच्यासोबत लव्ह इनमध्ये राहात होता.

 

बातम्या आणखी आहेत...