आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमधील पूरग्रस्तांना आरोग्यसेवा देण्यासाठी गिरीश महाजनांसह 100 डॉक्टरांचे पथक रवाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून पूरग्रस्तांना आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली 100 डॉक्टरांचे पथक सोमवारी सकाळी केरळकडे रवाना झाले आहे.

 

या चमूमध्ये जे. जे. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.श्रीनिवास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 50 डॉक्टर, तर ससून रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर गजानन भारती यांच्या मार्गदर्शनात २६ डॉक्टर, इतर स्वयंसेवक व सहायकांसह 100 व्यक्तींचे पथक वैद्यकीय सहायता पुरवणार आहे. यात सर्जरी, मेडिसिन, बालरोग, स्त्रीरोग, प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिनच्या तज्ज्ञांचा समावेश आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनातर्फे 20 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा यापूर्वीच केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार केरळ पूरग्रस्तांसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षातून सातत्याने माहिती देण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...