आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला जामीन मिळेपर्यंत भुकेली होती ही चिमुकली फॅन; हॉस्पिटलमध्ये घेतेय उपचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर/मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानची तुरुंगातून सुटका व्हावी, त्याला जामीन मिळावा, यासाठी लाखो चाहत्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली होती. विशेष म्हणजे यात एका चिमुकल्या फॅनचा समावेश होता. ही चिमुकली जोधपूर सेशन्स कोर्ट परिसरात हजर होती.

 

सलमानला जामीन मिळेपर्यंत तिने अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. या मुलीला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

 

दिल्लीची राहाणारी आनिया ही फेव्हरेट हीरो अर्थात सलामान खानसाठी जोधपूरमध्ये आली आहे. आनियाच्या हट्टामुळे तिचे आई-वडीलही तिच्यासोबत जोधपूरमध्ये आले आहेत. कोर्टाने सलमानला पाच वर्षाची शिक्षा सुनावली, तेव्हापासून तिने अन्न-पाण्याचा त्याग केला होता.  कोर्ट बाहेरही ती सलमानच्या सुटकेसाठी हातात पोस्टर घेऊन उभी होती. 'मै स्कूल नही जाऊंगी, खाना नही खाऊंगी, सलमान खान को रिहा करो', असे ‍‍आनियाने हातात धरलेल्या पोेेस्टरवर लिहिले होते. मात्र, पोटात अन्न नसल्याने श‍निवारी तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले. सलमानला जामीन मजूर झाल्याचे वृत्त ऐकताच आनियाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तिने अन्न-पाणी घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... सलमान खानची चिमुकली फॅन आनियाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...