आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: सेक्स करताना गर्लफ्रेंडचा मृत्यू, बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा; कुलाब्यातील लॉजमधील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सेक्स करताना गर्लफ्रेंडचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुलाब्यातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. दोघेही इस्रायली नागरिक आहेत. ओरिरन याकोव असे आरोपीचे नाव आहे.

 

टुरिस्ट व्हिसावर ते दोघेही मुंबईत आले होते. हे दोघे हॉटेलमध्ये सेक्स करत असताना त्याच्या गर्लफ्रेंडचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ही हत्या तर नाही ना? असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला होता.

 

मिळालेली माहिती अशी की, गेल्या वर्षी मार्च महिन्यात ही घटना घडली होती. ओरिरन याकोव हा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आला होता. कुलाबा भागात दोघे एका हॉटेलमध्ये थांबले होते. सेक्स करताना ओरिरनच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला होता.

 

काय सांगतो फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट..

फॉरेन्सिक लॅबने दिलेल्या अहवालानुसार, ओरिरन याकोव याच्या 20 वर्षीय गर्लफ्रेंडचा मृत्यू सेक्स करताना गुदमरून झाला होता. ओरिरन याकोव याने सेक्स करताना गर्लफ्रेंडचा गळा दाबला होता. त्यामुळे तिचा गुदमरून मृ्त्यू झाल्याचे देखील अहवालात स्पष्ट झाले आहे. यावरून पोलिसांनी आरोपी ओरिरन याकोविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. त्याला पोलिस अटक करणार आहेत.

 

काय आहे हे प्रकरण?

या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने हॉटेलमध्ये गेले होते. तिथे त्यांना ओरिरन याकोवची गर्लफ्रेंड निपचित पडली होती. पोलिसांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नंतर तिचा मृतदेह इस्त्रायलला नेण्यात आला होता.

 

बातम्या आणखी आहेत...