आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडी फोडणार्‍या गोविंदांना आता ७५ रुपयांत मिळणार १० लाखांचा विमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाच्या अादेशानुसार दहीहंडीच्या थरांंचे निर्बंध शिथिल करण्यात अालेले असले तरी १४ वर्षांखालील मुलांना हंडी फाेडण्याची मनाई करण्यात अाली अाहे. त्याचप्रमाणे गाेविंदांच्या सुरक्षिततेसाठीच्या विमा रकमेत वाढ करून ताे १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात अाला अाहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील सर्व गाेविंदा मंडळांनी अापल्या सदस्यांचा विमा काढून सुरक्षित हंडी फाेडा, असे अावाहन महाराष्ट्र दहीहंडी समन्वयक समितीने केले अाहे.  


गाेविंदांच्या अपघात विम्याच्या रकमेत वाढ करावी, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू हाेते. त्यानुसार २०१५ पर्यंत दीड लाख रुपये असलेली विम्याची रक्कम २०१६ मध्ये अडीच लाखांपर्यंत वाढवण्यात अाली. त्यानंतर गेल्या वर्षात दरडोई १०० रुपये हप्त्याप्रमाणे विम्याच्या रकमेत १० लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात अाली. परंतु राज्यातल्या गाेविंदांना १०० रुपये हप्ता भरणे शक्य नाही याचा विचार करून विम्याची सुरक्षा देणाऱ्या अाेरिएंटल इन्शुरन्सबराेबर झालेल्या यशस्वी वाटाघाटीनंतर विम्याच्या हप्त्याची रक्कम २५ रुपयांनी कमी करून ती अाता ७५ रुपयांवर अाणण्यात अाली अाहे. त्यामुळे प्रत्येक मंडळाने विचार करून अापल्या गाेविंदांसाठी विमा कवच बंधनकारक करावे, असे समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी  सांगितले.  


दहीहंडी उत्सवात गाेविंदा पथकांनी उगाच स्पर्धेच्या अाहारी न जाता सरावावेळी जितके थर लावले तितकेच थर प्रत्यक्ष दहीहंडीच्या दिवशी लावण्याचे कटाक्षाने पाळल्यास अपघात हाेणार नाहीत. त्याचप्रमाणे प्रत्येक गाेविंदाच्या गरजेनुसार त्यांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हार्नेस बेल्ट, चेस्ट गार्ड यांसारख्या साधनसामग्रीचा वापर केला जावा. त्याचप्रमाणे १४ वर्षांखालील मुलांना हंडी फाेडू न देण्याचे बंधन पाळावे, असे अावाहनही यांनी केले.  


गिर्याराेहकांची मदत  
हंडी फाेडत असताना अनेकदा थर काेसळताे. अशा स्थितीत खालच्या थरातील गाेविंदा सहीसलामत बाहेर पडू शकतात. परंतु हंडी फाेडणारा गाेविंदा दाेरीला लटकल्याचा प्रकार बऱ्याचदा घडताे. यातून त्याची सुटका करण्यासाठी यंदाच्या वर्षी गिर्याराेहकांची मदत घेण्यात येणार अाहे. असा प्रकार घडल्यास गिर्याराेहक दाेरीच्या मदतीने गाेविंदांची सुटका करतील, असे समितीने म्हटले.  


प्रायाेजकांनाे... घागर भरा  
दहीहंडी पथकांच्या उत्पन्नाची भिस्त  राजकीय पक्ष व बांधकामदारांकडून मिळणाऱ्या जाहिरातींवर असते. नाेटबंदी, जीएसटी आदींमुळे विकासकांना अार्थिक फटका बसला. थरांचे निर्बंध, राजकीय बॅनरबाजीविराेधातील कारवाईमुळे राजकीय पक्षांनीही पाठ फिरवली. त्यामुळे दहीहंडी उत्सवासाठी जंगी बक्षिसांची रया गेल्याने गाेविंदांत निरुत्साहाचे वातावरण हाेते. दहीहंडीची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी अायाेजकांनी पुढाकार घेऊन घागर उताणी करू नका, असे अावाहन समितीतर्फे करण्यात येणार अाहे.  

बातम्या आणखी आहेत...