आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या ड्रममध्ये आढळला होता सेक्स वर्करचा मृतदेह, 13 दिवसांत उकलले हत्येचे गुढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोवंडी भागातील सेक्स वर्करच्या हत्येचा गुंता सोडवण्यात शिवाजी नगर पोलिसांनी 13 दिवसांनंतर यश आले आहे. महिलेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह एका ड्रममध्ये लपवण्यात आला होता. या हत्येप्रकरणी नेरुळ येथून 60 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्याकांडात आरोपीच्या पत्नीचाही हात असल्याचा पोलिसांना         संशय आहे. आरोपीची पत्नी अद्याप फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.

 

पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले की, 11 मे रोजी दुपारी तीन वाजेदरमान गोवंडी भागातील नटवर पारेख कंपाउंड जवळ एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये 40 वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला होता. मृत महिला सेक्स वर्कर होती. हत्येचे गुढ उकलण्यासाठी शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक पगारे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) हुसेन जतकर यांच्या नेतृत्त्वात साहाय्यक  पोलिस निरीक्षक संतोष नरुटे, सचिन कदम, अविनाश पोरे, उत्तम रिकामे, पोलिस उपनिरीक्षक अमोधसिद्ध ओलेकर,अमित यादव,मयूर तेरदालकर,संदीप पाटील आणि अमोल ओलेकर यांची 6 पथके तयार केली होती. त्यात टिळक नगर,चेम्बूर आणि मुलुंड पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकार्‍यांनचाही समावेश होता.

 

आरोपीपर्यंत असे पोहोचले पोलिस...

- शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक अमोघसिद्ध ओलेकर यांनी सांगितले की, आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हाडा कॉलनीच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून एक हिंट मिळाली. सेक्स वर्करचा मृतदेह सापडला त्या ठिकाणाच्या आसपास एक लाल रंगाची थ्री व्हिलर (टेम्पो) अनेकदा फिरताना दिसली होती. टेम्पोमध्ये निळ्या रंगाचा पाण्याचा ड्रम ठेवलेला होता. नंतर पोलिसांनी त्या टेम्पोचा शोध सुरु केला. चालकाला ताब्यात घेतले. आरोपीने नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटजवळून ड्रम खरेदी केल्याची माहिती मिळाली. 600 रुपये भाडे देऊन ड्रम गोवंडी भागात आणण्यात आला होता. पोलिसांनी एपीएमसी मार्केटच्या सीसीटीव्हीचे फुटजे पाहिले असता बाबू भगवान पटेल नामक  व्यक्तीने निळा ड्रम खरेदी केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बाबू भगवान पटेल याला नेरुळ येथून अटक केली.

 

- हत्येत आरोपीची पत्नी नेहा पटेल हिचाही हात असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. नेहा दोन दिवसांपासून फरार आहे. जळगावला जाते, असे सांगून ती घराबाहेर पडली होती. तिला अटक करण्‍यासाठी एक पथक जळगावला रवाना झाले आहे.

 

सेक्स वर्कर होती महिला
- पोलिस सूत्रांनुसार, मृत महिला दादरमध्ये एकटी राहात होती.  ती देहविक्रीचा व्यवसाय करण्यात असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...