आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅनिटरी नॅपकिन GSTच्या कक्षेबाहेर..महाराष्ट्र सरकारची मागणी जीएसटी काऊन्सिलकडून मान्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली- केंद्र सरकारने शनिवारी देशभरातील सर्व म‍हिलांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सराकारने सॅनिटरी नॅपकिन जीएसटीच्या कक्षेतून बाहेर काढले. सॅनिटरी नॅपकिनवर आधी 12 टक्के कर आकारला जात होता, हा कर रद्द करण्यात आला आहे. आता सॅनिटरी नॅपकिनवर कोणत्याही कर आकारण्यात येणार नसल्याचे जीएसटी काऊन्सिलने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सरकारने ही मागणी लावून धरली होती. जीएसटी काऊन्सिलकडून अखेर ही मागणी मान्य करण्‍यात आली आहे.

 

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत साखरेवरील सेस संदर्भात अहवाल सादर करण्यात आला. मात्र याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. जीएसटी काऊन्सिलने 28 टक्क्यांच्या स्लॅबमधील 30 पेक्षा जास्त उत्पादनांवरील जीएसटीत कपात केली आहे. लिथियम आयन बॅटरी, बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या, फ्रीज, वॉटर कूलर आणि आईक्रीम तयार करण्यात येणारी उपकरणांचा समावेश आहे. सोबतच हॅडलूम आणि कुटीर उद्योगाशी संबंधित 40 वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. डेकोरेटीव्ह वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...