आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Street Fighter होते नारायण राणे, बाळासाहेबांच्या कृपेने पोहोचवले होते CMच्या खुर्चीपर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार नारायण राणे  यांचा आज (10 एप्रिल) 65 वा वाढदिवस. राणे यांच्या राजकीय करियरला शिवसेनातून सुरुवात झाली होती. सेनेने राणेंना शाखा प्रमुख ते मुख्यमंत्रिपद दिले. राजकारण येण्याआधी मुंबईत 60 च्या शतकात सक्रिय असलेल्या 'हर्‍या-नार्‍या' गॅंगमध्ये होते. विशेष म्हणजे या गॅंगमधील ते नार्‍या होते. दिवसाढवळ्या लुटकार करण्‍याण्यात ही गँग फेमस होती.

 

60 च्या दशकात सक्रीय होती 'हर्‍या-नार्‍या' गॅंग...

- नारायण राणे यांचा जन्म 10 एप्रिल, 1952 रोजी कुडाळ येथे झाला. 60 च्या दशकात मुंबईतील चेम्बूर भागात सक्रीय असलेल्या 'हर्‍या-नार्‍या' गॅंगमधील राणे हे नार्‍या होते.
- राणे यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल आहे.
- यादरम्यान, 'हर्‍या-नार्‍या जिंदाबाद' नावाने एक सिनेमा आला होता.
- राणेंच्या विरोधात मुंबईत एक एफआयआर दाखल आहे.
- राणे यांनी शिवसेनेत आल्यानंतर शाखा प्रमुख बनले होते. नंतर राणे शिवसेनेचे नगरसेवक बनले.

 

नारायण राणे यांचा राजकीय प्रवास...
- नारायण राणे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी 'शिवसैनिक' होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच नारायण राणेला ओळख मिळाल्याचे खुद्द राणे यांनी राणे यांनी त्यांच्या 65 व्या वाढदिवशी सांगितले होते.
– 1968: 16 वर्षे शिवसेनेत होते.
– 1985 ते 1990: शिवसेनेचे नगरसेवक नंतर बेस्टचे अध्यक्ष.
- 1990-95 : पहिल्यांदा आमदार बनले. नंतर विधान परिषदचे सदस्य
– 1996-99: शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री.
– 2005: उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद. 3 जुलै 2005 ला शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून काँग्रेसमध्ये प्रवेश.
– 2007: काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राणेंना मात दिली.
– 2009: राज्याचे उद्योगमंत्री बनले.
– 2014: लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणे यांचा पराभव. राणेंचा मंत्रिपदाचा राजीनामा.

 

खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंची केली होती हकालपट्टी...
- नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद सर्वश्रृत आहे. 18 वर्षांपूर्वी राणे राज्याचे मुख्यमंत्री होते. जवळपास नऊ महिने त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवले होते. यादरम्यान उद्धव ठाकरे आणि राणे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होतेस.
- राणे यांना शिवसेनेच्या रिमोट कंट्रोलने चालणारा मुख्यमंत्री असे संबोधले जात होते. भाजप-शिवसेना यांची युती तुटल्यानंतर राणे विरोधीपक्ष नेते बनले.
- दरम्यान, 2005 मध्ये खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. "नेते हटवण्याचे आणि निवडणुकीचे सर्व अधिकार आपल्याला आहे, असे नारायण राणे सांगत सुटले होते. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... नारायण राणे यांच्या फॅमिलीचे निवडक फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...