आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पहिल्याच पावसानेही पूरमय स्थिती, 9 ते 11 जूनदरम्यान ‘मुसळधार’चा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राजधानीत गुरुवारी मान्सूनपूर्व पाऊस बरसला. अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पालिकेचे पावसाळ्यासाठी सज्ज असल्याच्या दाव्याचे वाभाडे निघाले आहे. सध्या मान्सून गोव्यात असून ४८ तासांत मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. ९ ते ११ जूनदरम्यान राजधानीत मुसळधारपेक्षा अधिक पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि नौदलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, लोकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.  

 

२० मिनिट उशिरा लोकल, ९ विमाने अन्यत्र पाठवली  

पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली. लोकल २० मिनिटांपर्यंत उशिराने धावल्या. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने रेल्वेवर परिणाम झाला. लंडनहून मुंबई येत असलेले जेट एअरवेजचे विमान अहमदाबाद पाठवण्यात आले. ९ विमानेही इतरत पाठवली.

 

एनडीआरएफ आणि नौदलाचे जवानांना सज्जतेचे आदेश

एनडीआरएफच्या तीन तुकड्या परळ, मानखुर्द, अंधेरी पश्चिम क्रीडा संकुल आणि नौदलास कुलाबा, वरळी, घाटकोपर, ट्रॉम्बे, मालाड भागात तैनात करण्यात आले. मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... दादरमध्ये ५५ मिमी पावसाची नोंद...

बातम्या आणखी आहेत...