आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monsoon Session: ‍विधिमंडळाच्या ड्रेनेजमध्ये प्लास्टिक पिशव्या, दारु, बीअरच्या बाटल्यांचा खच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विधिमंडळ परिसरातील पाण्याचा निचरा करणाऱ्या मुख्य नाल्यात प्लास्टिक पिशव्या, दारु आणि बीअरच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. त्यामुळे विधान भवन परिसरात पाणी तुंबल्याचे बोलले जात आहे. विधानसभाध्यक्षांच्या पाहणी दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाली आहे.

 

हेही वाचा...नागपूर पाण्यात...निम्म्या शहरात गुढघाभर पाणी, गोंदियात प्रसूतीगृहात घुसले पाणी

 

दुसरीकडे, एरवी मुंबईत पाणी तुंबल्यावर शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भाजपची सेना नेत्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. मुंबईतील बराचसा भाग समुद्र सपाटीपेक्षा खाली असल्याने पाणी तुंबते, पण नागपूरमध्ये पाणी तुंबण्याचे कारण काय, असा तिखट सवाल  शिवसेना नेत्यांनी केला आहे. जोरदार पावसामुळे नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

इतिहासात पहिल्यांदा पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज स्थगित...
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा विधानभवनाच्या इमारतीत पावसाचे पाणी घुसले आहे. विधिमंडळाचे कामकाज बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. विधिमंडळ परिसरात व इमारतीत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले असून वीज गेलेली आहे. पाण्याचा निचरा होईपर्यंत वीज सुरळीत होऊ शकणार नाही. विधानसभा अध्यक्षांनी स्वत: सकाळी परिसराची पाहणी केल्यावर विधानसभेचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला.

 

विरोधी पक्षनेत्यांनी डागली टीकेची तोफ
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, अवघ्या अडीच तासांच्या पावसामुळे पूर्ण रस्ते ब्लॉक होतात, काहीही कारण नसताना ऐन पावसाळ्यात नागपुरात अधिवेशन घेणे, त्यावर कहर म्हणजे कोणतेही नियोजन नसल्याने कामकाज होऊ शकत नाही. हे सरकारचे मोठे अपयश आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना होत आहे.

 

कंट्रोल रूममध्ये पाणी शिरल्याने बत्ती गुल
विधिमंडळाच्या कंट्रोल रूममध्ये पाणी शिरल्याने तेथील वीज गेलेली आहे. पाण्याचा पूर्ण निचरा होईपर्यंत वीज सुरळीत होऊ शकणार नाही. रामनगर परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांचे बंगलेही या पावसात पूर्णपणे गळू लागले आहेत. बंगल्याच्या आवारात कंबरेएवढे पाणी साचले आहे. पाणी काढण्यासाठी किमान अडीच तास लागतील अशी सूत्रांची माहिती आहे.

 

धनंजय मुंडेंचे ट्विट...
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंबंधी ट्विटही केले आहे. "विधिमंडळाच्या इतिहासात अधिवेशन काळात लाईट जाऊन कामकाज बंद पडावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. सरकारचा नियोजनशून्य कारभार, नागपूरला अधिवेशन घेण्याचा निरर्थक बालहट्ट यामुळे ही वेळ आली आहे. 'दुसऱ्या ट्विटमध्ये मुंडे म्हणतात, "राज्यात जलयुक्त शिवार अयशस्वी झाले असले तरी सरकारने नागपूरात पावसाळी अधिवेशन घेऊन 'जलयुक्त नागपूर' असल्याचे मात्र दाखवून दिले आहे.'

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...