आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monsoon Update: कोकण-गोवा आणि मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; NDRFची 3 पथके तैनात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कोकण समुद्र किनारपट्टीसह गोवा आणि मुंबईत पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विमागाने दिला आहे. मुंबईसह उपनगरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील तीन दिवसांत मुंबईसह परिसरात रेकॉर्डब्रेक पाऊस होऊ शकतो, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे तीन पथक तैनात करण्यात आले आहेत.

 

कर्नाटक-मुंबईत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी..
केंद्र सरकारने देखील यापूर्वी केरळसह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला होता. मुसळधार पावसामुळे पाचही राज्यातील नदी, नाल्यांना पूर येऊ शकतो. किनार्‍यावरील लोकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात वाल्या आहेत.

 

हवामान विमागानुसार, 7 ते 12 जूनदरम्यान कोकण, गोवा आणि मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...