Home | Maharashtra | Mumbai | Jail Bharo Andolan Today In Maraharashtra For Maratha Reservation Live Update

राज्यभरात जेलभरो आंदोलन सुरु..सोलापूर-पुणे महामार्गावर ठिय्या, औरंगाबादेत आंदोलकांचे मुंडन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 02:06 PM IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाकडून बुधवारी राज्यभर जेलभरो आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

 • Jail Bharo Andolan Today In Maraharashtra For Maratha Reservation Live Update

  मुंबई- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाकडून बुधवारी राज्यभर जेलभरो आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात जेलभरो आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबईमधील आझाद मैदानावर तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात जेलभरो आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

  आत्मदहनाचा इशारा..

  मराठा अरक्षणासाठी 4 ऑगस्टला औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयात 6 जणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी गणपत म्हस्के कडुबा जगताप संजय काकडे वसंत उबाळे सुदाम सोळुंके आणि पोपट पवार यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

  LIVE UPDATE

  सोलापूर- सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी गावाजवळ आंदोलकांचा ठिय्या मांडला आहे. महामार्ग रोखल्याने वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

  नाशिक - मालेगाव शहरात जेलभरो आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

  औरंगाबाद- जालना रोडवरील वरूडपाटी येथे मराठा आंलोलकांनी रास्तारोको केला. काही आंदोलकांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

  लातूर - पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलकांचा ठिय्या आंदोलन केले. निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

  दरम्यान, राज्यभरात हे आंदोनल सुरू असतानाच परळी येथे मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी खुली बैठक घेण्यात येणार आहे. याच बैठकीत 9 ऑगस्टला म्हणजेच क्रांतीदिनी करण्यात येणाऱ्या आंदोलनाची घोषणा करण्यात येईल. असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी सांगितले आहे.

  मराठा आरक्षणाबाबद सरकारने 9 आॅगस्टपर्यंत निर्णय जाहीर करावा, अन्यथा मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानानंतर क्रांती मोर्चा आंदोलन पेटले आहे. यानंतर मराठा समाजातील सात युवकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. आता ‘मूक मोर्चा’ निघणार नाही. सरकारला इशारा देण्यासाठी आजचे जेलभरो आंदोलन आहे, हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाईल. परंतु, पुन्हा उद्रेक होण्याआधी सरकारने योग्य तो निर्णय जाहीर करण्याची गरज आहे, असे मत पोखरकर यांनी व्यक्त केले.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... राज्यभरात सुरु झालेल्या जेल भरो आंदोलनाचे फोटो..

 • Jail Bharo Andolan Today In Maraharashtra For Maratha Reservation Live Update
 • Jail Bharo Andolan Today In Maraharashtra For Maratha Reservation Live Update
 • Jail Bharo Andolan Today In Maraharashtra For Maratha Reservation Live Update

Trending