आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- जालना जिल्ह्यातील पोहेगावमधील शेतकरी प्रेमसिंग चव्हाण यांनी शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतात पिकवलेल्या फुलकोबी गड्डे उद्विग्न होऊन फावड्याने तोडून टाकले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या घटनेची दखल घेत व्यथित शेतकरी प्रेमसिंग चव्हाण यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून घेतले. त्याला धीर दिला. तसेच प्रेमसिंग चव्हाण यांना स्मृती प्रतिष्ठानकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फुलकोबीला कवडीमोल दर...
प्रेमसिंग चव्हाण यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतात फुलकोबीची लागवड केली होती. तयार झालेला कोबी त्यांनी बाजारपेठेत विक्रीसाठी नेला. मात्र, फुलकोबीला अक्षरश: कवडीमोल भाव मिळाला. त्यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने प्रेमसिंग चव्हाण हतबल झाले. नंतर उद्विग्न होऊन त्यांनी कोबीचे गड्डे फावड्याने फोडून आपला संताप व्यक्त केला होता.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... फुलकोबीचे गड्डे फावड्याने फोडतानाचा शेतकरी प्रेमसिंग चव्हाण यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.