आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी बलात्कार...मग पीडितेशी लग्न आणि मग हत्या; आरोपीला कोर्टाने सुनावली जन्मठेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आधी बलात्कार करून, मग पीडितेशी लग्न अन् नंतर तिची हत्या करणाऱ्या बांधकाम एजंटाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुकेश भंडारी असे आरोपीचे नाव असून त्याला 60 हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. मुकेश हा मूळचा कल्याणच्या कोविली गावचा रहिवासी आहे.

 

सरकारी वकिलांनी ठाणे जिल्हा न्यायालयात केलेल्या युक्तिवादानुसार, 26 वर्षीय पीडित कल्याणमध्ये आई आणि बहिणीसोबत राहत होती. 2015 मध्ये मुकेश भंडारीने तिचा लैंगिक छळ केला. यामुळे त्याच्यावर बलात्कार गुन्हा नोंदवून त्याला तुरुंगातही पाठवण्यात आले. 2015 मध्ये तो तुरुंगातून सुटला आणि एप्रिल 2015 मध्ये त्याने पीडितेशी लग्नही केले. मात्र, हे लग्न त्याने स्वत:ची सुटका करून घेण्यापुरतेच केले होते. तो नेहमीच पीडितेचा छळ करायचा. 9  जून 2015 रोजी पीडिता घरातून बेपत्ता झाली. दरम्यान, रागाच्या भरात ती माहेरी निघून केल्याचा दावा मुकेशने केला.   

 
हत्या करून मृतदेह पुरला  
पीडितेच्या नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेच  न सापडल्याने त्यांनी कल्याण पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, पीडितेला भिवंडी भागातील येवरी गावाजवळील एका झुडपात पुरल्याचे तपासात उघडले झाले. त्यानुसार पोलिसांनी मुकेशला अटक केली.  
 
संशयाला थारा नाही : न्यायालय  
सरकारी वकिलांनी पुराव्यासह भक्कम बाजू मांडल्यानंतर न्या. पी. पी. जाधव म्हणाले की, मुकेशनेच ही हत्या केल्याचे उघड आहे. पुरावे पाहता त्याने हत्या न केल्याचा संशयच शक्य नाही. परिस्थितीजन्य पुराव्यानुसार त्याला जन्मठेपेची शिक्षा देत आहोत.  

 

बातम्या आणखी आहेत...