आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यप्रेमींना खुशखबर..बारमध्ये MRP नुसार मिळणार मद्य, FL-2बाबत सरकार विचाराधीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मद्यप्रेमींना खुशखबर आहे. मद्याच्या अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करणार्‍या बार मालकांना राज्य सरकार लवकरच झटका देणार आहे. बारमध्ये लवकरच एमआरपीनुसार (MRP) मद्य  विकत घेणे शक्य होणार आहे.

 

काय आहे FL 2 परवाना?

राज्य सरकार याबाबतचा  FL 2 परवाना देण्याच्या विचारात आहे. सरकार यातून महसूल वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. यामुळे उत्पादन शुल्कात दहा टक्के वाढ होण्याचा सरकारचा अंदाज आहे. एफएल 2 परवाना मद्य विक्रीची परवानगी देतो, मात्र परिसरात मद्यपान करता येत नाही. सध्या बार आणि परमिट रुम्सना एफएल 3 परवाना दिला जातो. या परवान्याला अल्कोहोल सर्व्ह करण्याचे लायसन्स असेही म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...