आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- देशातील टॉप 5 'चोर बाजारात चोरीचे साहित्य विक्री केले जातात. बाजारात चोरी केलेले बूट, फोन, मोबाइल, गॅजेट्स, ऑटो पार्ट्सपासून तर कार देखील स्वस्त दरात खरेदी करता येते. विशेष म्हणजे या बाजारात चोरीच्या गाड्या मोडिफाय करून विक्री केल्या जातात. तसेच या बाजारात आपली कार किंवा बाईक उभी करणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा मारण्यासारखे आहे. चुकून तुम्ही चोर बाजारातील गल्लीत गाडी पार्क केली तर तुमच्याच गाडीचे स्पेअर पार्ट्स चोर बाजारातील दुकानांमध्ये तुम्हाला दिसतील
चला तर मग जाणून घेऊ या देशातील टॉप-5 चोर बाजारांविषयी...
मुंबई चोर बाजार
देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील 'चोर बाजार' दक्षिणी मुंबईतील मटन स्ट्रीट मोहम्मद अली रोडजवळ आहे. हा बाजार जवळपास 150 वर्षे जुना आहे. सुरुवातीला या बाजाराला 'शोर बाजार' असे संबोधले जात होते. दुकानदार मोठ मोठ्याने आवाज करून साहित्य विक्री करत होते. त्यामुळे या बाजारात कायम गोंधळ असायचा. मात्र, ब्रिटिश 'शोर' या शब्दांचा उच्चार 'चोर' असा करत, त्यामुळे 'चोर बाजार' असे नाव प्रचलित झाले.
येथे सेकंड हॅंड कपड, ऑटोमोबिल पार्ट्स आणि चोरी केलेल्या इम्पोर्टडेट घड्याळी, मोबाइल स्वस्त मिळतात. विशेष म्हणजे मुंबईच्या दौर्यावर आलेली राणी व्हिक्टोरिया यांचे साहित्य चोरी झाले होते. चोरीस गेलेले सर्व साहित्या मुंबईतील चोर बाजारात सापडले होते. तुमच्या घरातून चोरी झालेले साहित्यही या बाजारात पाहायला मिळू शकते.
काय आहे फेमस?
येथील रेस्तराँमधील कबाब काफी फेमस आहे. मात्र, या परिसरात फिरताना खिसेकापू लोकांपासून सावधान राहा.
केव्हा सुरु होतो बाजार?
बाजार दररोज सकाळी 11 वाजता सुरु होतो आणि सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांला बंद होतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... दिल्लीतील 'चोर बाजार' विषयी रंजक माहिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.