आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालघर आणि गोंदिया लोकसभा तर सांगलीमधील पलूस विधानसभा पोटनिवडणूक जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर आणि गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभेचीही पोटनिवडणूकही जाहीर झाली आहे. 28 मे रोजी मतदान तर 31 मे रोजी होणार मतमोजणी होणार आहे.

 

गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपमध्ये बंडखोरी करत राजीनामा दिल्याने गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पटोले यांनी पोटनिवडणूक न घेण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका कोर्टाने फेटाळली. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.

 

वनगांच्या घरात उमेदवारी दिल्यास शिवसेना लढवणार नाही

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी 2014 च्या पालघर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारली होती. वनगा यांचा कार्यकाळ संपायला 15  महिन्यांचा कालावधी उरला असताना त्यांचे आकस्मिक निधन झाले. वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसने या पोटनिवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपने वनगांच्या घरात उमेदवारी दिल्यास शिवसेना निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय ‍उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिवसेनेची भूमिकेवर भाजप या पोटनिवडणुकीचा उमेदवार कोण देते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्‍ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-केडगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...