आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RAPE CASE: मिथुन चक्रवर्तीच्या मुलाला लग्नाच्या दिवशी मिळाला अटकपूर्व जामीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली- बलात्कार आणि धमकीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती उर्फ मिमोह याला त्याच्या लग्नाच्या दिवशी  दिल्लील रोहिणी कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. दरम्यान, महाक्षय आणि मदालसा शर्मा यांचा आज (7 जुलै) होणार होता.

 

मुलाला अटक जामीन मिळवा यासाठी मिथुन आणि त्याची पत्नी योगिता बाली यांनी कोर्टात धाव घेतली होती. याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली. त्यात महाक्षय याला जामीन मंजूर करण्‍यात अला. भोजपुरी सिने अॅक्ट्रेसने महाक्षयवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता.

 

पीडितेचे वकील रवी सोनी यांनी सांगितले की, आरोपी महाक्षय आणि पीडिता मागील चार वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. महाक्षयने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या ड्रिंक्समध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. पीडितेने शुद्ध हरपल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कर केल्याचा दावा रवी सोनी यांनी केला आहे.

 

पीडितेला दाखवले लग्नाचे आमिष..
बलात्कारानंतर महाक्षय याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. नंतरही अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. महाक्षय आणि पीडितेची कुंडलीही जुळवून पाहाण्यात आली होती. परंतु पीडितेला स्विकारण्यास चक्रवर्ती फॅमिलीने स्पष्ट नकार दिला. त्यांनी दुसर्‍या मुलीसोबत महाक्षयचा विवाह ठरवला आहे.

 

काय आहे हे प्रकरण?
- 2 जून रोजी दिल्लीतील रोहिणीच्या एका कोर्टाने पोलिसांना महाक्षयच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.

- पीडितेने हिंदी आणि भोजपुरी सिनेमात काम केले आहे. पीडिते तक्रार करताना सांगितले की, 2015 पासून ती महाक्षयसोबत रिलेश‍नशिपमध्ये राहाते. या काळात महाक्षय याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.

तिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट एकता गाबा यांच्या कोर्टात तक्रार करणाऱ्या तरुणीने आपण बॉलिवूड व भोजपुरी चित्रपटांतील अभिनेत्री असल्याचे सांगितले आहे. ती एप्रिल 2015 मध्ये महाक्षयच्या संपर्कात आली.

- मे 2015 मध्ये महाक्षयने तिला एका फ्लॅटमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवले. लग्नाच्या आमिषाने त्याने अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गरोदर झाल्यानंतर तिचा गर्भपातही केला.

- पीडितेचा दावा आहे की, महाक्षय चक्रवर्ती हा लग्नास आता नकार देत आहे. 7 जुलैला त्याचा एका दुसऱ्या तरुणीशी विवाह होत आहे. विशेष म्हणजे, येत्या 7 जुलैला महाक्षय याचा विवाह दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची कन्या मदालसा हिच्यासोबत होत आहे.

- मिथुनचा मुलगा महाक्षय 2008 मध्ये आलेला 'जिमी'मध्ये पहिल्यांदा झळकला होता. परंतु बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा गल्ला जमवू शकला नाही. नंतर अॅक्शन सिनेमा 'दी मर्डरर'मध्ये महाक्षय याने काम केले. परंतु हा सिनेमा अद्याप रिलीज होऊ शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...