आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला एकटेच लढावे लागेल; काँग्रेससोबत आघाडी करु; राहुल यांच्याशी दोनदा चर्चा -पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी फक्त काँग्रेससोबत आघाडी करणार आहे. शिवसेनेला एकटेच लढावे लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी आघाडीच्या मुद्द्यावर दोनदा बोलणी झाली आहे. आम्ही एकत्र लढलो, तर एक मजबूत पर्याय उपलब्ध होईल, असा विश्वास पवारांनी यावेळी व्यक्त केला आहे.

 

दरम्यान, देशभरात लोकसभा 2019 निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली. राष्ट्रवादीनेही निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. मुंबईत प्रजासत्ताक दिनी विरोधकांनी संविधान बचाओ रॅलीचे आयोजन केले आहे. यामध्ये शरद पवारांसह अनेक दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.

 

संविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर कारवाई होणार...
संविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. परवानगी शिवाय ही रॅली काढल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

 

संविधान बचाव... देश बचाव...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुंबईत भाजपविरोधी संविधान बचाव रॅली काढण्यात आली. आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर काढलेल्या या रॅलीत कुठलीही घोषणा न करता विरोधकांनी मूक मोर्चा काढला आहे.

 

पाटीदार आरक्षण संघर्ष समितीचे प्रमुख हार्दिक पटेल यांनी सांगितले की, संविधान वाचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात आलो आहोत. मोदी महाराष्ट्रात 'गुजरात मॉडेल हुकूमशाही कारभार' पद्धत राबवत आहेत.

 

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जनता दलचे नेते शरद यादव, खासदार राजू शेट्टी यांच्यासह, माकपचे सीताराम येचुरी, लोक भारतीचे कपिल पाटील, गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी, कन्हैया कुमार आदी सविंधान बचाव रॅलीत सहभागी झाले आहेत.

 

उद्धव ठाकरेंच्या घोषणेचे स्वागत...

2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे ही चांगली बाब आहे. या घोषणेचे स्वागत करतो असे हार्दिक यांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... विरोधी पक्षांनी मुंबईत काढलेल्या संविधान बचाव रॅलीचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...