आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तक ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’चे मंगळवारी प्रकाशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (ता.24) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी साडेतीन वाजता हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

 

प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थितीत असेल.  पुण्यातील पत्रकार आशिष चांदोरकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून, औरंगाबाद येथील ‘साकेत प्रकाशन’ने पुस्तकाची निर्मिती केली आहे.

 

आशिष चांदोरकर यांनी आपल्या पुस्तकात देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. राज्य सरकारच्या तीन-साडेतीन वर्षांच्या कालावधीचे भारतीय जनता पक्षाचे विश्लेषण या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तसेच फडणवीस सरकारच्या विविध योजना आणि निर्णयाचा सामान्य नागरिकांना, कुटुंबांना तसेच समुदायांना कसा फायदा झाला आणि त्यांचे जीवनमान कशा पद्धतीने सुधारले, या संदर्भातील यशोगाथांचा पुस्तकात समावेश आहे.

 

आशिष चांदोरकर यांनी या पुस्तकाचे लेखन करण्‍यासाठी राज्याच्या 20 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाच हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून, विविध समाजघटकांशी बोलून आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...