आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील मनाली पाळंदे यांची स्वकर्तृत्वावर भरारी; जिद्दीने चालवली स्कूल बस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुरुषांची मक्तेदारी असलेल्या अनेक क्षेत्रांवर महिलांनीही कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे स्कूल बस चालवणे. पुण्यातील मनाली पाळंदे यांनी राज्यातील पहिल्या महिला स्कूल बसचालक हाेण्याचा मान मिळवला अाहे. इतकेच नव्हे तर या व्यवसायाला कंपनीचे स्वरूप देऊन हळूहळू ५० बस अाणून त्यांनी माेठ्या चिकाटीने व्यवसायाचा विस्तार केला अाहे. केवळ शाळांनाच नव्हे, तर कंपन्यांनाही त्यांच्या पाळंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत सेवा दिली जाते.

 

इलेक्ट्राॅिनक्स इंजिनिअर असलेल्या मनाली मूळच्या पनवेलच्या. विवाहानंतर मुंबईत स्थायिक झाल्या. त्यांचे पती राजेशही इंजिनिअर. त्यांच्या मदतीने मनाली यांनी प्राेसेस कंट्राेल इन्स्ट्रूमेंटस उपकरणांचे मुंबईत उत्पादन सुरू केले. पाच-सहा वर्षांत व्यवसायात चांगला जम बसला. पण धाकट्या मुलाला मुंबईची हवा न मानवल्याने त्यांना अखेर पुण्याला यावे लागले. पुण्यात राहून विक्रीपश्चात सेवा देणे शक्य नसल्याने त्यांना हा व्यवसायही बंद करावा लागला. पुण्यात अापल्या मुलांची त्या स्वत: मारुती व्हॅनमधून शाळेत ने-अाण करत. साेबत काही अन्य मुलांनाही त्या घेऊन जात. त्यांचा हा दिनक्रम पाहून इतर शाळेतील मुलींच्या काही पालकांनी त्यांना अापल्या पाल्यांना ने-अाण करण्याविषयी विचारणा केली. यातून त्यांना नव्या व्यवसायाची दिशा सापडली. दरम्यान, एका नवीन शाळेकडून मनाली यांना स्कूल बसच्या कंत्राटाविषयी विचारणा करण्यात अाली. काहीशा वेगळ्या असलेल्या या व्यवसायात उतरण्याचा मग त्यांनी निर्णय घेतला. एका वित्तसंस्थेकडून कर्ज घेतले, नातेवाइकांकडूनही काही भांडवल उभा करत मनाली यांनी एक बस खरेदी केली. पती राजेश नाेकरीत असले तरी बसच्या कर्जाचा हप्ता, ड्रायव्हरचा पगार हे सगळे गणित जुळेल असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे मागेपुढे न पाहता मनाली यांनी स्वत:च बस चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बस प्रशिक्षण, वाहन परवाना व बॅच हे सगळे साेपस्कार पार पाडले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... संकटांवरही मात

बातम्या आणखी आहेत...