आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकाळ संपण्याआधीच काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचा उपसभापतीपदाचा राजीनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी गृहमंत्री आणि विद्यमान विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी निरोप समारंभाच्या दिवशीच उपसभापती पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने ठाकरे यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते आहे. त्यांच्या राजीनाम्याची घोषणा सभागृहात करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सभागृहात केली. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारावा या काँग्रेसच्या सदस्यांनी दिलेल्या पत्रावर आपलीही स्वाक्षरी असल्याचा खुलासा करीत सभापती रामराजे निंबाळकर यांनी रघुवंशींनाच ही बाब सभागृहास अवगत करण्यास सांगितले. त्यामुळे ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील धुसफूस सभागृहात उघड झाली.

 

1985 साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यवतमाळ जिल्हा परिषदेपासून आपल्या राजकीय पदाची सुरुवात केलेल्या ठाकरे यांनी 1993 आणि 1999 साली गृहमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली. या काळात मुंबई बॉम्बस्फोट, मालेगावच्या दंगली या काळात गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर विधान सभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये ते सातत्याने निवडून येत होते. त्याशिवाय युवक काँग्रेसचे अध्यक्ष, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी संघटनात्मक काम केले. येत्या 27 जुलै रोजी त्यांची विधान परिषदेतील सदस्यत्वाची मुदत संपत होती. परंतु, त्याआधीच त्यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. यावेळच्या विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसने ठाकरेंचे तिकीट कापून, त्यांच्याच जिल्ह्यातील प्रतिस्पर्धीस उमेदवारी दिल्याने ठाकरेंनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जाते. राजीनामा दिल्यावर, निरोप समारंभासाठी ठाकरे सदस्य म्हणून सभागृहात येऊन बसले. निरोप समारंभाला उत्तर देताना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा परिषद निवडणूक लढवून राजकारणात केलेला प्रवेश ते गृहमंत्रीपदाच्या कारकीर्दीपर्यंतचे आपले अनुभव मांडले आणि सभागृहाचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...