आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा...मध्य रेल्वेचा रविवारी Jambo Block Mega Block At Central Railway Harbour Line On Sunday In Mumbai

रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा...मध्य रेल्वेचा रविवारी Jambo Block

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत मान्सूनचे अधिकृतपणे आगमन झाले आहे. येत्या 12 जूनपर्यंत मुंबईसह परिसरात अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्‍यासाठी तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून उद्या, रविवारी (ता.10) मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

 

मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या कामाच्या वेळापत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावर वाशी, बेलापूर, पनवेल डाऊन लाईनवर सकाळी 11 वाजून 34 मिनिटे ते दुपारी 4 वाजेपर्यंत तर दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे, अंधेरी, गोरेगावसाठी डाऊन रेल्वे सकाळी 9 वाजून 30 ‍मिनिटे ते दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

 

दुरुस्तीच्या कामामुळे अप हार्बर मार्गावरही परिणाम होईल. पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसटीएमसाठी सकाळी 9 वाजून 30 मिनिटे ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि वांद्रे, अंधेरी आणि गोरेगांवला सकाळी 10 वाजून 45 मिनिटे ते 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...