आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध दरवाढीचे आंदोलन चौथ्या दिवशी अखेर मागे, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर राजू शेट्टींची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/पुणे- दूधला प्रतिलिटर 25 रुपये देण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन आज (गुरुवार) चौथा दिवशी अखेर मागे घेण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्‍टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्ह असून शेतकर्‍यांना प्रतिलिटर 25 रुपये मिळत आहेत की नाही, यावर आमची नजर राहाणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

 

बुधवारी रात्री बुलढाण्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. स्वाभिमानीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी बुलढाणा-नागपूर एसटी बस फोडली. बुलढाण्यात आलापर्यंत तीन एसटी बस फोडण्यात आल्या आहेत. राज्यात ठिकठिकाणी दूध उत्पादक शेतकरी आपल्या जनावरासह मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

 

कोल्हापुरात किणी टोलनाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्‍यात आले. पुणे-बंगळुरु महामार्ग बंद पाडण्यात आला. सुमारे 3000 कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

बुलडाणा तालुक्यात वरवंड येथे कार्यकर्त्यांनी एस.टी. बस फोडली. चिखली, मलकापूर. पेठ, देऊळगावमही, डोणगाव, भादोला, संग्रामपूर, मेहकर, दुसरबिड येथे रस्तारोको करण्यात आला तर, डोणगाव येथे गाढवाला दुधाने आंघोळ घालून शासनाचा निषेध करण्यात आला. मेहकर येथे मुख्यमंत्र्याच्या प्रतिकात्म्क पुतळयाचे दहन करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी सकाळपासून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करून शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.


आजचा चौथा दिवस... कुठे काय?

- कोल्हापूर - किणी टोलनाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्‍यात आले. पुणे- बंगळुरु महामार्ग बंद पाडला. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. तीन हजार कार्यकर्ते रस्त्यावर

- दूध दरवाढीसाठी सुरू असलेल्या शाहूवाडी तालुक्यात चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. या आंदोलनास पाठिंबा देत उचत (ता. शाहूवाडी) येथील दूध उत्पादक शेतकरी बांधवांनी हनुमान मंदिरात अभिषेक घालून दूध रस्त्यावर ओतले.

 

- सोलापूर-  जिल्हाध्यक्ष महमूद पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली जोरदार आंदोलन.

 

- बुलढाणा-  सिंदखेड राजा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेन केला रास्ता रोको.

- जनावरासह शेतकरी व स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्यायावर उतरल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. बुलडाणा तालुक्यात वरवंड येथे कार्यकर्त्यांनी एस.टी. बस फोडली. चिखली, मलकापूर. पेठ, देऊळगावमही, डोणगाव, भादोला, संग्रामपूर, मेहकर, दुसरबिड येथे रस्तारोको करण्यात आला तर, डोणगाव येथे गाढवाला दुधाने आंघोळ घालून शासनाचा निषेध करण्यात आला. मेहकर येथे मुख्यमंत्र्याच्या प्रतिकात्म्क पुतळयाचे दहन करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी सकाळपासून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करून शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

- वरुड,जाफ्राबाद जालना

जाफ्राबाद-चिखली हद्दीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना,जाफ्राबादच्या वतीने चक्का जाम आंदोलन व मयुर बोर्डे व प्रेमसिंग धनावत सह 30 कार्यकर्ते अटक

 

- नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी जनावरांसह शेतकऱयांचा रास्ता रोको. अनेक  कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. काँग्रेस, शिवसेनासह विविध सामाजिक संघटनांचाही पाठिंबा

 

- सांगली - मिरज-पंढरपूर रोडवर चक्काजाम आंदोलन

 

- पंढरपुर- पंढरपूर येथे कार्यकर्त्यांनी रस्तावर दूध ओतले,आणि रास्त रोकोत सरकार चा निषेध केला

- जामखेड तालुक्यातील खर्डा येथे सकाकी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्व पक्षांच्या वतीने चक्का जाम आदोलन स्वाभिमानी

- बारामती येथे चकका जॅम आंदोलन

- पुण्यात स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी पुणे बगलोर महामार्ग शिवापूर टोल नाक्याजवल अडवला

- नाशिक जिल्ह्यात स्वाभिमानीचे  सर्व कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
 

- शहादा- येथे रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले त्या दरम्यान कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

 

- राक्षसभुवन फाटा (जि. बीड), 211 राष्ट्रीय महामार्गावर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्यानी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दुध बंद आंदोलनाला दत्त साखर कारखान्याचे चेअरमन मा. गणपतराव पाटील व संपूर्ण कामगार युनियन यांचा जाहिर पाठींबा.

- जामखेड तालुक्याच्या वतीने खर्डा येथे ,चक्कम आंदोलन सुरू झाले,तालुक्यातील विरोधी पक्षाचे सर्व नेते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खर्डा या ठिकाणी उपस्थित

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... दूध आंदोलनाचे फोटो...
 

बातम्या आणखी आहेत...