आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्येच्या मंदिरात अल्पवयीन विद्यार्थिंनीसोबत अश्‍लील चाळे; नराधम शिक्षकाविरुद्ध गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रत्नागिरी शहरातील एका नामांकित शाळेत गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फअल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करण्‍यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

सहावीत शिकणार्‍या दोन अल्पवयीन मुलींना बंद वर्गात नेऊन त्यांच्याशी अश्‍लील चाळे  करण्‍यात अाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रकरणी पोलिसांनी एका शिक्षकाला अटक करण्‍यात आली आहे. आरोपी शिक्षकाविरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो)  नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शामसुंदर कृष्णाजी गोठणकर (रा.कुवारबांव, रत्नागिरी) असे नराधम शिक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. शामसुंदर गोठणकर याने  सहावीत शिकणार्‍या दोन्ही पीडित मुलींना मॉनिटर केले होते. नंतर त्याने त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मुलींचे मोबाइलमध्ये सेल्फी काढायचा असल्याचे सांगून त्याने दोन्ही मुलींना एका वर्गात नेले. वर्गात गेल्यावर आरोपीने दरवाजा बंद करून त्यांच्याशी अश्‍लील चाळे केले. मुलींनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. नंतर पालकांनी पोलिस स्टेशन गाठून नराधम शिक्षकाविरोधात तक्रार दिली.

 

पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्या विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत अशीच घटना समोर आली होती.  सरस्वती भुवन महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थिनीसोबत व्हॉट्‍सअॅपवर अश्लील संवाद साधणार्‍या शिक्षकाच्या तोंडाला काळे फासण्यात आले होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

 

 

 

बातम्या आणखी आहेत...