आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथुन चक्रवर्तीच्या कुटुंबियांना दिलासा नाहीच, मुंबई हायकोर्टाने मुलगा-पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती लग्नाच्या 5 दिवसांआधीच बलात्काराच्या प्रकरणात अडकला आहे. मिथुन चक्रवर्तीच्या कुटुंबियांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. महाक्षय चक्रवर्ती आणि योगिता बाली यांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला आहे.

 

दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने महाक्षय चक्रवर्तीविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मिथुन यांच्या पत्नी योगिता बाली यांनाही मुलाच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

 

काय आहे हे प्रकरण?  
अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट एकता गाबा यांच्या कोर्टात तक्रार करणाऱ्या तरुणीने आपण बॉलिवूड व भोजपुरी चित्रपटांतील अभिनेत्री असल्याचे सांगितले आहे. ती एप्रिल 2015 मध्ये महाक्षयच्या संपर्कात आली.

 

आरोपानुसार, मे 2015 मध्ये महाक्षयने तिला एका फ्लॅटमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवले. लग्नाच्या आमिषाने त्याने अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गरोदर झाल्यानंतर तिचा गर्भपातही केला. तरुणीचा दावा आहे की, महाक्षय चक्रवर्ती हा लग्नास आता नकार देत आहे. 7 जुलैला त्याचा एका दुसऱ्या तरुणीशी विवाह होत आहे. विशेष म्हणजे, येत्या 7 जुलैला महाक्षय याचा विवाह दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची कन्या मदालसा हिच्यासोबत होत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...