आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन अंदुरेच्या अटकेवरून जितेंद्र आव्हाडांचा भाजप नगरसेवकावर निशाणा; तक्रार दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अंनिसचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने औरंगाबाद येथून सचिन अंदुरे याला अटक केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून ‘तीन वर्षापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात माझ्यावर जो प्राणघातक हल्ला झाला तेव्हा अंदूरे हा धीरज घाटे बरोबर तिथे उपस्थित होता’ असे सांगितले आहे.

 

याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धीरज घाटे यांनी आक्षेप घेत याप्रकरणी सचिन अंदुरे याच्याशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नसून नाहक बदनामी केल्याप्रकरणी आव्हाड यांचे विरोधात सायबर क्रार्इम सेल आणि दत्तवाडी पोलिस यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

 

दिल्लीतील जेएनयु मधील कन्हैय्याकुमार आणि उमर खलीदच्या मुद्द्यावरुन आमदार आव्हाड यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात मार्च 2015 मध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी अभविप, भाजप कार्यकर्त आणि आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक उडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी घाटे म्हणाले, सचिन अंदुरे या व्यक्तीस आपण ओळखत नसून त्याचे नाव ही यापूर्वी कधी ऐेकले नाही. फर्ग्युसन महाविद्यालयात जे आंदोलन झाले त्यावेळी मी अग्रभागी होतो. त्याबाबतचे फुटेज पोलिस आणि प्रसारमाध्यमांकडे उपलब्ध असून ते पाहिल्यास सत्यता बाहेर येर्इल. त्यावेळी अंदुरे हा माझ्यासोबत नव्हता हे ही यामाध्यमातून समोर येर्इल. आव्हाड यांनी बेजबाबदार आणि बिनबुडाचा आरोप माझ्यावर केले असून याप्रकरणी त्यांच्या विरोधात मी लवकरच अब्रुनुकसानीचा दावा ही दाखल करणार आहे. आव्हाड यांनी हेतूपरस्पर ट्‍वीट करुन विनाकारण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आव्हाड यांच्या चुकीच्या धोरणा विरोधात मी मध्यंतरीच्या काळात दोन ते तीन ब्लॉग लिहिले होते, त्याचा राग त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांनी सदर कृत्य केले असावे.

बातम्या आणखी आहेत...