आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई काँग्रेसची अब्रु चव्हाट्यावर...कँडल मार्चमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्तीचा विनयभंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उन्नाव, कठुआ बलात्कार घटनेच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसच्या वतीने मागच्या आठवड्यात काढण्यात आलेल्या कँडल मार्चदरम्यान एका महिला काँग्रेस कार्यकर्तीचा विनयभंग झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने पक्षाच्या मुंबई शहर विभागाकडे तक्रार देखील केली आहे.


मुंबई काँग्रेसने हा कँडल मार्च जुहू येथे आयोजित केला होता. या प्रकरणाची माहिती सदर महिलेने मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडे दिली अाहे. निरुपम यांनी दोषी आढळलेल्यांवर कार्यकर्त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे महिलिने सांगितले. या महिलेने या घटनेबद्दलचा संदेश मोबाइलद्वारे आपल्याला पाठवल्याचे निरुपम यांनी सांगितले आहे.


बलात्काराच्या निषेधार्थ असणाऱ्या कँडल मार्चमध्येच युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांकडून अखालच्या पातळीवरील घटना घडने ही शरमेची बाब आहे. या घटनेमुळे पक्षातील महिला कार्यकर्त्यांना असुरक्षितता वाटू लागले असल्याचे पिडीत महिलेचे म्हणणे आहे.


कँडल मार्चदरम्यान मिडियामध्ये आपले चेहरे झळकण्यासाठी पुरुष कार्यकर्त्यांना पुढे जायचे होते. त्यासाठी त्यांनी आम्हाला ढकलले आणि ते पुढे कॅमेऱ्यासमोर गेले असे या महिलेने सांगितले. भविष्यात होणाऱ्या काँग्रेसच्या मोर्चांमध्ये तरी महिला कार्यकर्त्यां सुरक्षित राहतील अशी नियोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे या महिलेने अपेक्षा व्यक्त केली आहे. विनयभंगाच्या या घटनेमुळे मात्र मुंबई काँग्रेसची अब्रु चांगलीच चव्हाट्यावर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...