आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या लाईफलाईनला BREAK, शाळांना सुटी..डबेवाल्यांची सेवा बंद.. वाचा 10 मोठे FACTS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे रुपांतर जणू 'वॉटर पार्क'मध्ये झाल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी उपनगरीय रेल्वे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. जवळपास 90 लोकल ट्रेन रद्द करण्‍यात आला आहेत. इंद्रायणी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर रद्द करण्‍यात आल्या असून अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. बहुतांश गाड्या 10 ते 15 मिनिटांनी उशीरा धावत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्‍टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा-महाविद्यालयाना सुटी जाहीर करण्‍यात आली आहे. विशेष म्हणजे डबेवाल्यांनी आज सेवा बंद ठेवली आहे.

 

मुंबई: वॉटर पार्ट..

- मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.   

- पालघर जिल्ह्यातील वसईत सर्वाधिक 299 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. 300 लोक घरात अडकले आहेत.   
- लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु स्थानिक घर सोडायला तयार नसल्याचे सांगितले जात आहे. खबरदारी म्हणून या परिसरात अॅम्ब्युलन्स उभ्या करण्‍यात आल्या आहे.    
- काही भागात गुढघाभर पाणी साचले आहे.
- पावसामुळे महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे केले आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्‍डे पडले आहे.
- खड्ड्‍यांमध्ये पाणी भरले गेल्याने कल्याणमध्ये शिवाजी चौकात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
- मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्‍यात आली आहे.
- पश्चिम रेल्वेच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, रेल्वे ट्रॅक पाण्यात गेल्याने अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे.  
- मुंबईत मंगळवारी पावसाचा जोर कायम राहाणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
- कुलावा वेधशाळेत 24 तासांत 170.6 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...